डॉ. सुहास जेवळीकर माझा फक्त दरवाजा, खांदा नव्हता, तर माझा बारमाही उत्सवही होता!
आम्ही एकमेकांत विरघळलो होतो. मी असं मानतो की, माणसाला आयुष्यात किमान एकतरी असा मित्र असावा, ज्याच्या घराचा दरवाजा विनाप्रश्न चोवीस तास उघडा असावा आणि कुठल्याही चुकीसाठी त्याच्या खांद्यावर विश्वासानं डोकं ठेवून रडता यायला हवं. आता सुहास गेला, आणि गेल्या वर्षी ६ डिसेंबरला गुरूवर्य प्रा. ल.बा. रायमाने सर. हे दोन माझे आश्वासक दरवाजे आणि खांदे होते.......